मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळकने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेता सुयशने आयुषी भावेसोबत साखरपुडा केला आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने अधिकृत घोषणा केली. सुयशच्या पोस्टवर सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सुयशची भावी पत्नी आयुषीदेखील अभिनेत्री असून खऱ्या आयुष्यात ती खूप ग्लॅमरस आहे.
बऱ्याचदा कलाकारांच्या अफेयर्सच्या चर्चा ऐकायला मिळतात. मात्र सुयशसोबत आयुषीला पहिल्यांदाच पाहण्यात आले. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहते चकीत झाले.
खरेतर सुयशने जून महिन्याच्या सुरूवातीलाच गुपचूप साखरपुडा केला. त्याने आयुषीच्या वाढदिवसादिवशी ही खास बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांची जोडी चाहत्यांना खूपच भावली आहे. आता चाहते ते दोघे लग्न कधी करणार याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
आयुषी भावे ही अभिनेत्री आणि डान्सरदेखील आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी भावे झळकली आहे. तसेच ती लवकरच एका आगामी चित्रपटात दिसणार आहे.
आयुषी भावेचा एक लावणीचा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. 'या गावचं की त्या गावचं' या लावणीचा व्हिडीओ पहायला मिळतो आहे.
सुयश टिळक सध्या झी मराठीवरील 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत शंतनुची भूमिका साकारताना दिसतो आहे.