Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एकमेकांना धरुन पुढे गेलात, तरच...", मराठीतील कंपूशाहीबद्दल अजिंक्य देव यांची स्पष्ट प्रतिक्रिया, म्हणाले-"कांतारा सारखा चित्रपट…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:55 IST

मराठीतील कंपूशाहीबद्दल अजिंक्य देव यांची स्पष्ट प्रतिक्रिया, म्हणाले-"तर आपली प्रगती…"

Ajinkya Deo: बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीतील कंपूशाही हा मुद्दा कायमच वादग्रस्त मुद्दा राहिला आहे.बरेच जण यावर अगदी खुलेपणाने बोलत असतात. तर काही जण अडून अडून बोलताना दिसतात. अशातच मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव यांनी या मुद्यावर भाष्य केलं आहे. यामुळे इंडस्ट्रीला फायदा होतोय की तोटा? याचा विचारही केला पाहिजे, असं मतंही त्यांनी मांडलं आहे.

अजिंक्य देव हे नाव मराठी प्रेक्षकांना काही नवीन नाही. माहेरची साडी या चित्रपटामुळे ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. सिनेसृष्टीत आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. नुकतीच अजिंक्य देव यांनी अमोल परचुरेंच्या 'कॅचअप मराठी'ला मुलाखत दिली.त्यादरम्यान, मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास तसेच तेव्हाची चित्रपटसृष्टी आणि आताची, त्यामध्ये काय बदल झालाय, हेही सांगितलं. इतकंच नाहीतर , सध्या साऊथ, हिंदी  सिनेमांच्या तुलनेत मराठी सिनेमा तितका व्यवसाय करण्यात का कमी पडतोय याचं कारणंही त्यांनी स्पष्ट केलंय तेव्हा ते म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम हा झालाय की आपण एक नाही आहोत. जरी आपली भाषा एक असली तरीही प्रत्येकामध्ये कुठेतरी एक स्पर्धेचं वातावरण आहे.एका दृष्टिने हे चांगलंच आहे. स्पर्धा असावी पण, याचा अर्थ असा नाही की त्याच्यावर पाय देऊन मी स्वत:पुढे जाईन. स्पर्धा अशी असावी जेव्हा आपण एकमेकांना घेऊन पुढे जाऊ. जर तुम्ही एकमेकांना धरुन पुढे गेलो तरच अख्खी इंडस्ट्री वाढते. नाहीतर एखादा कंपू वाढू शकतो."

कंपूशाही काय म्हणाले?

त्यानंतर पुढे ते म्हणाले,"आपली इंडस्ट्री मोठी परंतु त्यातही आपण छोटे आहोत. त्यामध्येआपल्यासोबत हिंदी इंडस्ट्री आहे, सगळे भाषिक लोक इथे राहतात. कारण इथूनच त्यांना पैसा मिळतो. त्यामुळे आपण भरडलं गेलोय. त्याच्यामध्ये जर तुम्ही कंपू बनवले. एकमेकांच्या चित्रपटांसाठी सहकार्य नाही केलंत तर आपली प्रगती कशी होणार? 

आपण रिस्क नाही घेत नाही...

"आज कन्नड इंडस्ट्री खूप मोठी झाली. कांतारा सारखा चित्रपट दोनशे-अडीचशे कोटी कमवतोय. इतकंच नाहीतर त्याचा दुसरा भाग काढला तो सुद्धा तितकाच यशस्वी झाला. आज आपला असा कुठलाच चित्रपट नाही ज्याने एवढी कमाई केलीये. तुम्हाला कळतंच नाही की काय करायचं. आपण रिस्क नाही घेत नाही. आपली क्षमता थोडी कमी आहे. आपल्याला सेफ्टी हवी असते.त्याच्याविरुद्द दुसरे भाषिक त्याच ताकदीने चित्रपट घेऊन येतात आणि ते यशस्वी होतात." असं स्पष्ट मत अजिंक्य देव यांनी मांडलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Industry thrives on unity, says Ajinkya Deo on Marathi camp culture.

Web Summary : Ajinkya Deo highlights Marathi cinema's lack of unity hindering its growth, unlike successful Kannada films like 'Kantara.' He stresses collaboration over competition, advocating for collective progress to rival other language industries. Risk-taking and industry support are crucial, he added.
टॅग्स :अजिंक्य देवमराठी अभिनेतासेलिब्रिटीसिनेमा