Join us

अभिजीतला ग्रासले भीतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 11:27 IST

 भित्यापाठी ब्रम्हराक्षस असे आपण अनेकदा म्हणतो. प्रत्येकाच्या मनाच्या कोपºयात कशाची न कशाची तरी भीती असतेच आणि हे अगदी नैसर्गिक ...

 भित्यापाठी ब्रम्हराक्षस असे आपण अनेकदा म्हणतो. प्रत्येकाच्या मनाच्या कोपºयात कशाची न कशाची तरी भीती असतेच आणि हे अगदी नैसर्गिक आहे. पण काहींमध्ये भीतीचा अतिरेक दिसून येतो. अभिनेता अभिजीत खांडकेकरलाही सध्या भीतीने ग्रासले आहे. अभिजीतच्या मनात नेमकी कसली भीती आहे? हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाच असेल याचं उत्तर प्रेक्षकांना १६ डिसेंबरला प्रदर्शित होणाºया ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित भय या आगामी सिनेमातून मिळणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन व संकलन राहुल भातणकर यांनी केले आहे. माझ्याआजवरच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी व चॅलेजिंग असल्याचं सांगत, भय हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की खिळवून ठेवेल असा विश्वास अभिजीतने व्यक्त केला. या सिनेमात भीती मनात ठेऊन जगणाºया व्यक्तींना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंतवून टाकणारा प्रवास पहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजीतसोबत स्मिता गोंदकरदेखील पाहायला मिळणार आहे. ही जोडी पहिल्यांदा रूपेरी पडदयावर झळकणार आहे. भय सिनेमात अभिजीत खांडकेकरसह उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवडकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिमार्ते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निमार्ता आहेत. सहकारी निमार्ते अनिल साबळे आहेत. कथा-पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफार राजेश राठोर आहेत. १६ डिसेंबरला भय हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.