Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिज्ञा भावे आहे प्रेग्नेंट?, फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण, पती कमेंटमध्ये म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 15:16 IST

Abhidnya Bhave : अभिज्ञा भावेने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मेहुलसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) हिने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि सोशल मीडियावर ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर कर असते. नुकतेच तिने नवरा मेहुल पैच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो शेअर केले होते. यातील एका फोटोमुळे ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अभिज्ञा भावेने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मेहुलसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर मेहुल काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसतो आहे. ते दोघेही यावेळी एकमेकांना मॅचिंग करताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत तिने मेहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अभिज्ञाचा हा फोटो पाहून एकाने तिला ‘गरोदर आहेस का?’ असे विचारले आहे. तर दुसऱ्याने तिला गुडन्यूज आहे का? तुझ्याकडे बघून असं वाटतं आहे, अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने तिच्या या पोस्टमधील ‘आहोचेबाबा’ या हॅशटॅगवरुन कमेंट केली आहे.

दरम्यान या सर्व पोस्टवर तिचा नवरा मेहुल पै याने प्रतिक्रिया दिली आहे. मेहुलने यावर दोन इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. या इमोजीवरुन तो आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अभिज्ञा खरोखर प्रेग्नेंट आहे की नाही, याबद्दल अद्याप त्या दोघांनीही दुजोरा दिलेला नाही.  

टॅग्स :अभिज्ञा भावे