Prajkata Mali: प्राजक्ता माळी (Prajkata Mali) हा मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने चाहत्यांना आपलसं केलं आहे. सध्या सर्वत्र प्राजक्ताची 'फुलवंती' या चित्रपटामुळे चर्चा होताना दिसते आहे. प्राजक्ता माळीच्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्याला प्रेक्षकांची वाहवा मिळते आहे. 'फुलवंती' सिनेमामध्ये तिने प्रशंसनीय काम केलंय. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ताने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहलंय, "महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर या घडीला मी बंगळुरू आश्रमात आश्रमवासी असते."
पुढे प्राजक्ताने लिहलं, "होय होय… इथे राहणं, ध्यान करणं इतकं आवडतं. आश्रमवासी नाही होऊ शकले तरी निदान १५-२० दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन. आणि सातत्याने इथे येत राहीन."
शिवाय या व्हिडीओच्या माध्यमातून प्राजक्ताने चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणते, "नमस्कार मंडळी! मी आता आर्ट ऑफ लिव्हिंग या बंगळुरु येथील आश्रमामध्ये आहे. थोड्याच वेळात सत्संग सुरू होणार आहे. त्याआधी मी ठरवलं की, मला तुम्हाला काय तरी सांगावं. जे मी खरंतर करतेय, ते खूपच भारी आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था प्राणायाम, ध्यान आणि योग शिकवते. यात अनेक बेसिक आणि अॅडव्हान्स कोर्सदेखील आहे. चार महिन्यातून एकदा हा कोर्स करावा लागतो. मी हा कोर्स आश्रमात राहून पूर्ण केला. खरंतर लोकांना ध्यानधारणा करायची असते पणते नक्की कसं करायचं? हे माहित नसतं. असं ती या व्हिडीओमध्ये म्हणते आहे. शिवाय या व्हिडीओमार्फत तिने चाहत्यांना हा कोर्स करण्याचं आवाहनही केलं आहे.