Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैराटच्या 'झिंगाट'वर मराठी कलाकार थिरकले

By admin | Updated: April 25, 2016 20:42 IST

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या आगामी 'सैराट' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील या चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्याने

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या आगामी 'सैराट' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील या चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्याने तर अक्षरक्ष:  सर्वांनाच वेड लावले असून अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये हे गाणे सैराट सुरु आहे.  
‘झिंग झिंग झिंगाट’ हे गाणे रिलीज झाल्यापासून प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. त्यातच आता मराठी कलाकारांनी ‘झिंग झिंग झिंगाट’ म्हणत या गाण्यावर ठेका धरला आहे. त्यांचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर थैमान घालत आहे. याचबरोबर काही दिवसांपूर्वीच या गाण्यावर दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि संगीतकार अजय-अतुल यांनीही डान्स केला होता. तो व्हिडिओही चांगलाच हिट झाला होता. 'सैराट' हा चित्रपट येत्या २९ तारखेला रिलीज होणार आहे. 
 
 

 
सदर, व्हिडिओ दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फेसबुक पेजवरून घेण्यात आला आहे.