Join us

‘सूर नवा ध्यास नवा’मधून स्पृहा जोशी आऊट; 'ही' ग्लॅमरस अभिनेत्री करणार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 12:14 IST

Spruha joshi: स्पृहाऐवजी झळकणारी अभिनेत्री कायम तिच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकमुळे चर्चेत येत असते

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक असलेला शो म्हणजे 'सूर नवा ध्यास नवा'. आतापर्यंत या कार्यक्रमाचे जवळपास पाच पर्व पार पडले असून प्रत्येक पर्व सुपरहिट ठरला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही पर्वांमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी (spruha joshi) हिने सूत्रसंचालक पदाची जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, येत्या सहाव्या पर्वामध्ये या कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. या नव्या पर्वात अभिनेत्री स्पृहा जोशी दिसणार नसून तिच्या जागी एक नवीन अभिनेत्री झळकणार आहे.

सूर नवा ध्यास नवाच्या आवाज तरुणाईचा हे नवं पर्व लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या नव्या पर्वाची उत्सुकता लागली आहे. यामध्येच कलर्स मराठीने नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्पृहाऐवजी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात अभिनेत्री रसिका सुनील (Rasika sunil) सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. तर,अवधूत गुप्ते आणि महेश काळे हे परिक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत. येत्या ७ ऑक्टोबरपासून हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :रसिका सुनिलस्पृहा जोशीटेलिव्हिजनमहेश काळेअवधुत गुप्ते