मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णी ओळखली जाते. बकुळा नामदेव घोटाळे सिनेमातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर 'नटरंग', 'पोश्टर गर्ल', 'हिरकणी', 'मितवा', 'झिम्मा', 'क्लासमेट्स', 'धुरळा' असे अनेक सुपरहिट सिनेमे तिने केले. सोनालीने २०२१ मध्ये कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. तो दुबईमध्ये कार्यकरत आहे. लग्न झाल्यानंतर अनेकांनी सोनालीला पैसेवाला नवरा बघितला, असं म्हणत ट्रोल केलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनालीने याबाबत भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
सोनालीने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लग्नानंतर आर्थिक स्वातंत्र्याबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, "लग्नाच्या वेळेला माझ्या बाबांची सगळ्यात मोठी भीती काय होती माहितेय...लग्न झाल्यावर तुझं अकाऊंट तुझा नवरा बघणार का? मीच बघेन ना? मी म्हटलं हो...माझे फायनान्शियल मॅनेजर तुम्हीच असणार...ते कोणीच तुमच्याकडून हिसकावून घेणार नाही. यात माझ्या नवऱ्याचा किंवा सासरकडच्या कुणाचाही हस्तक्षेप नाही. अजूनही ते अत्यंत चोख पद्धतीने ते बघतात, त्यांना जमतं. मी घरी पण थोडे पैसे देते काहीच बदललेलं नाहीये".
"बऱ्याचदा लोकांच्या खूप कमेंट्स येतात. किंवा सुरुवातीला खूप कमेंट्स यायच्या की बाहेरगावचा नवरा बघितला अर्थात खूप पैसे कमावणारा असेल. शेवटी मुली हेच करतात. मला अतिशय अभिमानाने सांगायचंय की मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते. माझे अकाऊंट्स वेगळे आहेत. त्याचे वेगळे आहेत. त्याचे बिल्स वेगळे आहेत. त्याने आजवर कधी नाही विचारलं की तू कमवते तर तुझे पैसे कुठे जातात? आणि याचं त्यालाही काही वावगं वाटत नाही. इनसिक्योरिटी वाटत नाही. आणि मलाही याचं काही वेगळं नाही वाटत", असंही तिने सांगितलं.
Web Summary : Sonalee Kulkarni, often trolled for marrying a wealthy man, reveals she earns more than her husband. She emphasized her financial independence and separate accounts, stating her husband respects her financial autonomy.
Web Summary : सोनाली कुलकर्णी, जो अक्सर अमीर आदमी से शादी करने के लिए ट्रोल होती हैं, ने खुलासा किया कि वह अपने पति से ज़्यादा कमाती हैं। उन्होंने अपनी वित्तीय स्वतंत्रता और अलग खातों पर ज़ोर दिया, और कहा कि उनके पति उनकी वित्तीय स्वायत्तता का सम्मान करते हैं।