Join us
Daily Top 2Weekly Top 5

'झिम्मा 2' च्या पोरी खरंच कमाल; 'मराठी पोरी'वर शिवानीने अजिंक्यला धरायला लावला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 16:54 IST

Jhimma 2: सध्या सोशल मीडियावर अजिंक्य आणि शिवानीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सध्या मराठी कलाविश्वात एका मागून एक अनेक दमदार सिनेमांची निर्मिती होत आहे. अलिकडेच सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेला झिम्मा हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला मिळालेल्या अपार यशानंतर त्याचा पुढचा पार्ट अर्थात झिम्मा २ देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच त्याच्यातलं मराठी पोरी हे गाणं तुफान व्हायरल झालं आहे. याच गाण्यावर आता अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने चक्क तिच्या बॉयफ्रेंडला नाचवलं आहे.

'झिम्मा 2' या आगामी सिनेमात अभिनेत्री शिवानी सुर्वे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर या सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टी शेअर करत आहे. यामध्येच तिने तिच्या सिनेमाती गाण्यावर चक्क तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजेच अजिंक्य ननावरे याला ताल धरायला लावला आहे. इतकंच नाही तर ती सुद्धा त्याच्यासोबत या गाण्यावर थिरकली आहे.

दरम्यान, शिवानी आणि अजिंक्या यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'झिम्मा 2' हा सिनेमा येत्या २४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :सिनेमासिद्धार्थ चांदेकरशिवानी सुर्वेसोनाली कुलकर्णी