Join us

डीप नेक ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय मराठी सिनेसृष्टीतील ही अभिनेत्री, तुम्ही ओखळलंत का तिला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 16:40 IST

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती.

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. अभिनयासह नृत्य कलेतही ती पारंगत आहे. वैदेही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते. वैदहीने तिचा ब्लॅक कलरचा बॅकलेस ड्रेस घालता आहे. वैदही या ड्रेसमध्ये खूप स्टनिंग दिसतेय. तुम्ही एखाद्याला तुमचा आदर करायला भाग पाडू शकत नाही, असे कॅप्शन दिलं आहे. वैदहीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

अभिनेत्री वैदही परशुरामीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून वैदहीने मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले.तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.

रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

टॅग्स :वैदेही परशुरामीसेलिब्रिटी