Join us

या मराठी अभिनेत्रीने शेअर केला स्टनिंग फोटो, चाहते झाले क्लिनबोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 17:56 IST

सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री सरिता मेहेंदळेने  सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. सरिता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. 

तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. सरिताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने सिल्वर रंगाचा वनपीस घातला आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

भागो मोहन प्यारे' मालिकेत तिने साकारलेली 'मधुवंती'ची भूमिका मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. सरिताने अभिनय क्षेत्रात अनेक वर्ष स्ट्रगल केलं आहे आणि त्यानंतर तिला मधुवंतीची भूमिका मिळाली.

मुळची सांगलीच्या असलेल्या सरिताने असे हे कन्यादान, स्वरस्वती मालिकेत देखील अभिनय केला आहे. तसेच ये चल असे नसते आणि अर्धसत्य अशा नाटकांमध्ये तिने आपल्या अभिनयची चुणूक दाखवली आहे.

टॅग्स :सरिता मेंहदळे