Join us  

सई लोकूरच्या लेकीचं बारसं झालं, नावाचा अर्थ आहे फारच खास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 3:44 PM

चिमुकलीच्या आगमनाने सई आणि तीर्थदीप आनंदी आहेत. नुकतंच सईने तिच्या लाडक्या लेकीचं नावही ठेवलं आहे.

मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर काही दिवसांपूर्वीच आई झाली आहे. सईने डिसेंबर महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. सोशल मीडियावरून सईने कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. चिमुकलीच्या आगमनाने सई आणि तीर्थदीप आनंदी आहेत. नुकतंच सईने तिच्या लाडक्या लेकीचं नावही ठेवलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सईने याची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

सईने पती आणि लेकीबरोबरचा एक गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सई आणि तीर्थदीपने त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव ताशी असं ठेवलं आहे. या नावाचा अर्थही तिने पोस्टमध्ये सांगितला आहे. "आम्ही एक महिन्याचे झालो. आमचा आनंद आणि आमच्या डोळ्यांतीला तारा...ताशी रॉय या आमच्या परीची ओळख करून देत आहोत. आई आणि बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात. आम्हाला तुझे पालक निवडल्याबद्दल आभारी आहोत. या जगातील तू सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होता," असं सईने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

सईने २०२० मध्ये तीर्थदीप रॉयशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर ३ वर्षांनी सई आणि तीर्थदीप आईबाबा झाले आहेत. सईने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही सई सहभागी झाली होती. 

टॅग्स :सई लोकूरसेलिब्रिटी