Join us

मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप केला साखरपुडा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 09:55 IST

मराठी कलाविश्वातील एका अभिनेत्रीनेही गुपचूप साखरपुडा केला आहे. त्याचे फोटो समोर आले आहेत.

सध्या कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. दिवाळीनंतर अनेक कलाकारांनी मुहुर्त गाठला असून एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. तर काही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. अलिकडेच अभिनेता निखिल राजेशिर्के याने लग्नगाठ बांधली. तर सारं काही तिच्यासाठी फेम अभिषेक गावकरही नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. आता त्याच्यामागोमाग मराठी कलाविश्वातील एका अभिनेत्रीनेही गुपचूप साखरपुडा केला आहे. 

टीव्ही अभिनेत्री ऋतुजा लिमये हिने साखरपुडा केला आहे. फोटो शेअर करत तिने ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ऋतुजाने बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडा केला असून लवकरच ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. "फायनली...यावर विश्वास बसत नाहीये. रात्री उशिराचे फोन ते एकमेकांना दिलेली वचनं, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडपासून ते लाइफ पार्टनर होण्यापर्यंतचा ४ वर्षांचा प्रवास सुंदर होता", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण, तिने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. तिच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

ऋतुजाने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. सही रे सही या नाटकातही ती झळकली होती. याशिवाय अनेक मालिकांमध्ये ती छोटेखानी भूमिका साकारताना दिसली. नवे लक्ष्य, अस्मिता, चूक भूल द्यावी घ्यावी, खुलता कळी खुलेना, तू माझा सांगाती, दिल दोस्ती दोबारा, अंजली, जिंदगी नॉट आऊट, जय देवा श्री गणेशा या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग