Join us  

'बलात्कार संस्कृती' म्हणजे काय? टॉक शोमध्ये प्राजक्ता माळी करणार भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 6:59 PM

Prajakta mali: बलात्कार संस्कृती हे शब्द उच्चरायला विचित्र वाटतील कारण संस्कृती सामान्यतः पवित्र आणि सकारात्मक संदर्भात पाहिली जाते.

बलात्कार संस्कृती हे शब्द उच्चरायला विचित्र वाटतील कारण संस्कृती सामान्यतः पवित्र आणि सकारात्मक संदर्भात पाहिली जाते. पण संस्कृती हे केवळ सुंदर, रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या परंपरा आणि चालीरितींचे नाव नाही. बलात्कार संस्कृती' म्हणजे अशी सामाजिक व्यवस्था ज्यामध्ये लोक बलात्कार पीडितेला पाठिंबा देण्याऐवजी अप्रत्यक्षपणे बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा देतात. या विकृतीलाच बलात्कार संस्कृती असं म्हणत या विषयावर लवकरच एका टॉक शोमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे भाष्य करणार आहेत.

बलात्कार संस्कृती म्हणजे ती परंपरा ज्यामध्ये बलात्कारासाठी स्त्रीला जबाबदार धरले जाते. 'बलात्कार संस्कृती' म्हणजे अशी संस्कृती ज्यामध्ये बलात्कार आणि महिलांवरील हिंसाचार या गंभीर गुन्ह्यांऐवजी किरकोळ आणि दैनंदिन घटना म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच भारतीय बलात्कार संस्कृतीविषयी भाष्य करण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री पूर्वा शिंदे व्हीमास मराठीचा राडा राडा या टॉक शो अंतर्गत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 

या शोमध्ये प्राजक्ता आणि पूर्वा बलात्कार संस्कृतीला आळा घालण्यासाठी काही मोलाचे सल्ले वा संदेश देणार आहेत. थोडक्यात, या शोच्या माध्यमातून या अभिनेत्री सामाजिक विषय हाताळणार आहेत. दरम्यान, व्हीमास मराठीचा राडा राडा या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये सध्या समाजात घडत असलेल्या ज्वलंतविषयावर भाष्य केलं जाणार आहे. या कार्यक्रमात कलाकारांचे, विचारवंताचे मत प्रेक्षकांना कळणार आहे.  

टॅग्स :प्राजक्ता माळीपूर्वा शिंदेसेलिब्रिटीटेलिव्हिजन