Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? लवकरच होणार आई; पोस्ट केलं प्रेग्नंसी फोटोशूट

By ऋचा वझे | Updated: March 10, 2025 14:10 IST

बऱ्याच काळापासून अभिनेत्री पडद्यावरुन गायब आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीपासून दूर गेलेल्या अनेक अभिनेत्री आज घर-संसारात गुंतल्या आहेत. काही अभिनेत्रींनी नुकतीच गुडन्यूजही दिली आहे. 'मन उधाण वाऱ्याचे'मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा गद्रेने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला. आता आणखी एक अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. ती देखील काही काळापासून पडद्यावरून गायब आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर मॅटर्निटी फोटोशूट पोस्ट केलं आहे.

ही अभिनेत्री आहे मानसी मोघे (Manasi Moghe). पांढऱ्या आऊटफिटमध्ये मानसीने फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा बेबी बंप दिसून येतो. तिच्यासोबत तिचा नवरा सूर्या शर्माही आहे. होणाऱ्या आईबाबांनी हे रोमँटिक आणि कोझी फोटोशूट केलं आहे. मानसीच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लोही बघायला मिळतोय. सूर्या कधी बेबी बंपला किस करतोय तर कधी मानसीला जवळ घेत प्रेम व्यक्त करत आहे. दोघंही खूप आनंदात दिसत आहेत. 'मॉम डॅड लोडिंग..' असं कॅप्शन तिने दिलं आहे.

मानसीच्या या फोटोंवर काही कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तसंच त्यांच्या फोटोंना पसंती दर्शवली आहे. अनेकांचं मन भरलं नसून त्यांनी आणखी फोटो अपलोड करण्याची विनंती कपलला केली आहे. एकंदर त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम व्यक्त केलं आहे. 

वर्कफ्रंटअभिनेत्री मानसी मोघेने २०१५ साली 'बुगडी माझी सांडली गं'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. तिने 'ख्‍वाबों के परिंदे' या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तर सूर्या शर्मादेखील अभिनेता आहे. त्याने बऱ्याच वेबसीरिजमध्ये काम केले आहे. 'अनदेखी', 'ये काली काली आँखे', 'हॉस्टेजेस' आणि 'ब्राउन' या सीरिजचा समावेश आहे.

टॅग्स :मानसी मोघेमराठी अभिनेताप्रेग्नंसीव्हायरल फोटोज्सोशल मीडिया