Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्रीने घरी आणली नवी कोरी कार, शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:12 IST

'नवरा माझा नवसाचा २' फेम अभिनेत्री हेमल इंगळेने नुकतीच नवी गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत. नुकतंच टीव्ही अभिनेता राम कपूरने त्याच्या स्वप्नातली लॅम्बोर्गिनी गाडी खरेदी केली. आता मराठी अभिनेत्रीने नवी कोरी कार घरी आणली आहे. 'नवरा माझा नवसाचा २' फेम अभिनेत्री हेमल इंगळेने नुकतीच नवी गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

हेमलने शेअर केलेल्या या व्हिडिओत आधी जुनी गाडी दिसत आहे. त्यानंतर तिने खरेदी केलेल्या नव्या गाडीची झलक पाहायला मिळत आहे. हेमलने Volkswagen या कंपनीची लाल रंगाची कार खरेदी केली आहे. याआधी तिच्याकडे Volkswagen कंपनीची Polo GTI ही गाडी आहे. नव्या गाडीचा व्हिडिओ शेअर करत ती म्हणते, " Polo GTI ला नवं भावंडं मिळालं". अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

'नवरा माझा नवसाचा २' या सिनेमामुळे हेमलला लोकप्रियता मिळाली. तिने अशी ही आशिकी या सिनेमात अभिनय बेर्डेसोबत स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय हार्दिक शुभेच्छा या सिनेमातही ती झळकली आहे. हेमलने जानेवारी महिन्यात बॉयफ्रेंड  रौनक चोरडियासोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी