Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही मराठमोळी अभिनेत्री करतेय वांग्याची शेती, पहा तिचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:00 IST

या मराठमोळ्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केले शेतातील फोटो

छोट्या पडद्यावर तरुणाईच्या मनावर गाजवणारी मराठी मालिका म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी... या मालिकेतून अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, पूजा ठोंबरे व पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या कलाकारांना या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. ही मालिका बंद झाली असली तर या कलाकारांनी तरुणांच्या मनातलं स्थान कायम केलं आहे. या मालिकेनंतर हे कलाकार नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये झळकताना दिसले. हे सगळे कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांना अपडेट देत असतात.

दिल दोस्ती दुनियादारी मालिकेत मीनलची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे आणि ती फोटो शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

स्वानंदीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती शेतात बसलेली असून वांग्यांच्या ढिगाऱ्याजवळ बसलेली दिसते आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, तीन वांगी झेलू बाई...

स्वानंदी दिल दोस्ती दुनियादारी मालिकेनंतर झी युवा वाहिनीवर प्रसारीत झालेली मालिका गुलमोहरमधून रसिकांच्या भेटीला आली होती.

त्याशिवाय तिने डोन्ट वरी बी हॅप्पी या नाटकातही काम केलं आहे. या मालिकेत तिच्या आधी स्पृहा जोशी होती. मात्र स्पृहाने काही कारणास्तव मालिकेला अलविदा केल्यावर तिच्याजागी स्वानंदीची वर्णी लागली. या नाटकात स्वानंदी सोबत उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे. अद्यापही या मालिकेचे प्रयोग सुरू आहेत. 

टॅग्स :स्वानंदी टिकेकरझी मराठीअमेय वाघसखी गोखले