Join us

कोल्हापुराच्या रांगड्या मातीत वहिनीसाहेबांचा हेवी वर्कआऊट; पाहा photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 18:30 IST

Dhanashri Kadgaonkar: अलिकडेच तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये धनश्री हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारुन तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर (Dhanashri Kadgaonkar). या मालिकेत धनश्रीने हुकमीपणा आणि गावरान ठसका दाखवणाऱ्या नंदिताची भूमिका साकारली होती. ही मालिका संपून आज बरेच दिवस झाले.मात्र, धनश्रीची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी कायम उत्सुक असतात.

सध्या धनश्री तिच्या लेकाला कबीरला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तिचा कलाविश्वातील वावर किंचितसा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कायम तिच्याविषय़ीचे अपडेट शेअर करत असते.  यामध्ये अलिकडेच तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये धनश्री हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे.

दरम्यान, बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर धनश्री कोल्हापूरला गेली असून येथील जीममध्ये तिने घाम गाळला आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं शूट सुरु असताना ज्या जीममध्ये धनश्री एक्सरसाईज करायला यायची त्याच जीममध्ये ती बऱ्याच वर्षांनी पुन्हा गेली. त्यामुळे तेथे वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ तिने पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती जीम ट्रेनरच्या अंडर हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी तिच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :धनश्री काडगावकरसेलिब्रिटीटेलिव्हिजन