Join us
Daily Top 2Weekly Top 5

सन मराठीवरील 'जुळली गाठ गं' मालिकेत 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची वर्णी? म्हणते- "लवकरच येतेय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 13:44 IST

सध्या मराठी मालिकाविश्वात एकामागोमाग नव्या मालिकांची घोषणा करण्यात येत आहे.

Surekha Kudachi: सध्या मराठी मालिकाविश्वात एकामागोमाग नव्या मालिकांची घोषणा करण्यात येत आहे. स्टार प्रवाहवरील आई बाबा रिटायर होत आहेत!, 'लग्नानंतर होईलच प्रेम', 'तू ही रे माझा मितवा' तसेच 'अशोक मा.मा' या मालिकांची घोषणा केल्यानंतर आता सन मराठी वाहिनीवर नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'जुळली गाठ गं'  असं नव्या मालिकेचं नाव आहे. अभिनेत्री पायल मेमाणे या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अलिकडेच मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर समोर आला होता. परंतु 'जुळली गाठ गं'मध्ये कोणते कलाकार झळकणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रश्न होते. आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.  कोण आहे ही अभिनेत्री?

सन मराठीवरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा कुडची झळकणार असल्याचं कळतंय. नुकतीच सोशल मीडियावर सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. "लवकरच येतेय आपल्या भेटीला, नव्या भूमिकेत जुळली गाठ गं या आपल्या सन मराठीवर"असं कॅप्शन देत सुरेखा यांनी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. 

#Newserial, #Project तसेच #MarathiMulgi असे टॅग्ज त्यांनी या व्हिडीओला दिले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सुरेखा कुडची यांनी आपल्या नव्या प्रोजेक्टची हिंट प्रेक्षकांना दिली खरी पण त्या कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार?  हे पाहणं महत्वाचं ठरेल. 

अभिनेत्री सुरेखा कुडची गेली अनेक वर्षे त्या कलाविश्वात सक्रिय आहेत. सुरेखा यांनी आजवर विविध मालिका आणि सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सुरेखा कुडची 'बिग बॉस मराठी- ३' मध्येही सहभागी होत्या. 'फॉरेनची पाटलीण', 'पहिली शेर - दुसरी सव्वाशेर - नवरा पावशेर' अशा सिनेमांमध्ये सुरेखा कुडची यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया