Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! लग्नानंतर अडीच वर्षांनी पाळणा हलणार, शेअर केला गोड व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 09:58 IST

'तुझ्या माझ्या संसाराला…', फेम अमृता पवार लवकरच होणार आई; लग्नाच्या दीड वर्षानंतर घरी हलणार पाळणा

Amruta Pawar: 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', 'स्वराज्यजननी जिजामाता' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री अमृता पवार घराघरात पोहोचली. परंतु 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेमध्ये तिने साकारलेलं अदिती नावाचं पात्र आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. दरम्यान, अमृताने २०२२ मध्ये नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या संसाराला सुरुवात केली आहे. अमृता पवार आणि नील पाटील यांच्या लग्नाला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आता लग्नाच्या अडीच वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.  नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने गरोदर असल्याचे संकेत दिले आहेत. अमृता येत्या काही दिवसात आई होणार आहे. 

अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या पतीसह ती अनेक नवनवीन जागांवर भ्रमंती करताना दिसते. अशातच नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओद्वारे अमृताने आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्री अमृता पवार आणि नील पाटील लवकरच होणार आई बाबा होणार आहेत.

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, सुरुवातीला एका एस्केलेटलरवरून (सरकता जिना ) दोन चपलांचे जोड खाली येताना दिसत आहेत. त्यानंतर अगदीच एक-दोन पायऱ्यांचं अंतर सोडून तिथे लहान मुलाची चप्पल दिसते आहे. अखेरीस या तिन्ही चपला योग्य ठिकाणी येऊन पोचतात. त्यानंतर खऱ्या अर्थानं या व्हिडीओचा अर्थ गवसतो आहे. "बेबी ऑन द वे...", असं कॅप्शन अमृता पवारने या व्हिडीओला दिलं आहे त्यामुळे तिचे चाहते सुद्धा प्रचंड खुश झाले आहेत. दरम्यान, अमृताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्रीचे सगळे फॉलोअर्स, मालिकेतील सहकलाकार आणि मनोरंजनविश्वातून सध्या तिला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया