Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टफ्रेंडसोबत रेश्माचा क्रेझी डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 16:17 IST

Reshma shinde: सध्या सोशल मीडियावर रेश्मा आणि अभिज्ञा या दोघींचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी रेश्मा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसाठी शेअर करत असते. यावेळी तिने तिच्या बेस्टफ्रेंडसोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघीही क्रेझी होऊन डान्स करत आहेत.

अभिनेत्री अभिज्ञा भावे, अनुजा साठे आणि रेश्मा शिंदे या तिघींच्या मैत्रीविषयी फारसं कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. या तिघींची मैत्री सर्वश्रुत आहे. कायम या तिघी एकमेकींसोबत व्हिडीओ, फोटो शेअर करत असल्याचं पाहायला मिळत. यावेळी रेश्मा आणि अभिज्ञाने त्यांचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

अलिकडेच अभिज्ञाच्या नवऱ्याचा म्हणजेच मेहुल पैचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या बर्थडे पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याच वेळी रेश्मा आणि अभिज्ञाने त्यांचा हटके डान्स व्हिडीओ शूट केला. त्यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांनी टाईमपास म्हणून तो शूट केल्याचं लक्षात येत आहे. परंतु, तरीदेखील त्यांच्यातील मैत्री पाहून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :रेश्मा शिंदेटेलिव्हिजनअभिज्ञा भावेसेलिब्रिटी