Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी कलाकारांचा सिंगापूरमध्ये कल्ला

By admin | Updated: October 19, 2016 02:36 IST

आजच्या धावपळीच्या युगात माणसांना स्वत:साठीदेखील वेळ नाही, पण जर खूप दिवसांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक एकत्रित आले

आजच्या धावपळीच्या युगात माणसांना स्वत:साठीदेखील वेळ नाही, पण जर खूप दिवसांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक एकत्रित आले, तर एकच प्रकारचा जल्लोष केला जातो. अशा वेळी मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील? सिंगापूर येथे वन वे तिकीट आणि फॅमिली कट्टा या चित्रपटाची टीम नुकतीच एकत्रित आली. हे कलाकार कामाच्या निमित्ताने तिथे गेले होते. कामासोबत त्यांनी सिंगापूरमध्ये खूप सारी मजा-मस्ती केली. अभिनेता सुशांत शेलार याने नुकताच या दोन्ही चित्रपटाच्या टीमचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यामध्ये नेहा महाजन, शशांक केतकर, सुशांत शेलार, सचित पाटील, अमृता खानविलकर हे कलाकार आहेत.