Join us

कामाचे पैसे थकवल्याने लोकप्रिय अभिनेता भडकला, म्हणाला - "पैसे न देणाऱ्यांचं काय करायचं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 15:27 IST

अभिनेत्यानं एक संतप्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.  

Suyash Tilak : मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून अभिनेता सुयश टिळकला ओळखले जाते. उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. आतापर्यंत तो विविध नाटक, मालिका, चित्रपटात झळकला आहे. सुयश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा समाजातील विविध गोष्टींवर तो व्यक्त होताना दिसतो. आताही सुयश टिळक सध्या चर्चेत आलाय. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याची एक पोस्ट. 

नुकतंच सुयश टिळकने एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे.  काम करूनही अद्याप सुयशला त्याच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. याबाबत पोस्टमधून त्याने संताप व्यक्त केला आहे. "तुम्ही केलेल्या कामाचे पैसे वेळेत मिळण्याची अपेक्षा चूक? अशा पैसे न देणाऱ्या, उशिरा देणाऱ्यांचं काय करायचं?" असा सवाल त्याने या पोस्टमधून केला आहे. यासोबतच सुयशने डोक्याला हात मारुन घेणारे इमोजीही जोडले आहेत. 

सुयशने त्याच्या पोस्टमध्ये कुणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे त्याचा रोख नेमका कुणाकडे आहे, हे कळू शकलेले नाही.  अलिकडेच सुयश हा अबोली मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला. त्याने 'बापमाणूस', 'पुढचं पाऊल', 'दुर्वा', 'जाऊ नको दूर बाबा', 'सख्या रे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. सुयशचा चाहता वर्ग मोठा आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन प्रोजेक्टबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असतो. 

टॅग्स :सुयश टिळकसेलिब्रिटीमराठी अभिनेता