Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुयश टिळकची नवी मालिका, दिसणार नव्या भूमिकेत; प्रोमो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:22 IST

नव्या मालिकेतून सुयश टिळक प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमो प्रदर्शित

'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सुयश टिळक. या मालिकेने सुयशला प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर सुयश अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसला. अल्पावधीतच सुयशने मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आता लवकरच सुयश नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सुयशच्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. 'आदिशक्ती' असं त्याच्या नव्या मालिकेचं नाव असून सन मराठीवर ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील आणि सुयश टिळक यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. या मालिकेच्या प्रोमोवरुन सुयश पुन्हा एकदा मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजत आहे. याआधी त्याने 'अबोली' मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली होती. 

'आदिशक्ती' मालिका ६ मे पासून सुरू होणार असून रात्री ८:३० वाजता सन मराठी चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेत सुयश आणि पल्लवीबरोबर अंबरिश देशपांडे, सुश्रृत हे कलाकारही असणार आहेत. 

टॅग्स :सुयश टिळकटिव्ही कलाकारमराठी अभिनेता