Join us

एक अविस्मरणीय क्षण! महाराष्ट्रात आलेल्या PM मोदींची मराठी अभिनेत्याने घेतली भेट, म्हणतो- "एकनाथ शिंदेंमुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:58 IST

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आलेल्या नरेंद्र मोदींची मराठी अभिनेत्याने भेट घेतली. 

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अवघ्या काही दिवसांवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून जोरदार प्रचार सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. ठिकठिकाणी प्रचारसभा घेत मोदींनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आलेल्या नरेंद्र मोदींची मराठी अभिनेत्याने भेट घेतली. 

मराठी अभिनेता सुशांत शेलारने नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "एक अविस्मरणीय क्षण" असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे ही भेट झाल्याचंही सुशांतने म्हटलं आहे. "भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांची भेट. एक अविस्मरणीय क्षण! हे सर्व आपले मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे शक्य झाले आहे. मा.शिंदे साहेबांनी सामान्य कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याचे काम नेहमीच केले आहे. आणि यामुळेच आम्हाला सकारात्मक काम करण्याची ऊर्जा मिळते!", असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे. 

सुशांत हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाचा कार्यकर्ता आहे. शिवसेना सचिव आणि शिव चित्रपट सेना अध्यक्ष ही दोन पदं सध्या तो सांभाळत आहे. महायुतीकडून वरळी मतदारसंघाची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली होती. महायुतीच्या प्रचार रॅलीतही तो दिसतो. 

टॅग्स :नरेंद्र मोदीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मराठी अभिनेता