Join us  

Sachit Patil : अभिनेता सचित पाटीलची बायको आहे लोकप्रिय गायिका; दिसते फारच सुंदर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 8:00 AM

Sachit Patil : सचित पाटील हा सर्वांचा आवडता अभिनेता. लवकरच सचित पाटील ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात झळकणार आहे. सचितच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता असणारच...

सचित पाटील ( Sachit Patil) हा सर्वांचा आवडता अभिनेता. आजवर अनेक मालिका, चित्रपटात तुम्ही त्याला पाहिलं असेलच. लवकरच सचित पाटील ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात झळकणार आहे. सचितच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता असणारच. तर आज आम्ही तुम्हाला सचितच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत. होय, सचितची पत्नीदेखील मनोरंजन विश्वात काम करते. ती एक लोकप्रिय गायिका आहे.

तिचं नावं शिल्पा पै (Shilpa Pai). शिल्पाने आजवर अनेक गाणी गायली आहेत. केवळ मराठी भाषेत नाही तर भोजपुरी भाषेतही अनेक गाण्यांना तिने आवाज दिला आहे. सचितच्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातील अनेक गाणी तिने गायलेली आहेत. (Sachit Patil’s Wife Shilpa Pai)

सचित सोशल मीडियावर अनेकदा बायकोसोबतचे फोटो शेअर करत असतो. सचितची बायको दिसायला कमालीची सुंदर आहे. अगदी मराठीच्या अभिनेत्रींइतकी सुंदर.

  सचित पाटीलने ‘क्यों’ या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर सब कुछ है कुछ भी नही, रास्ता रोको यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. त्यानंतर तो दिग्दर्शनाकडे वळला. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘साडे माडे तीन’ या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली. त्यानंतर त्याने अवधुत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटात त्याने काम केलंच शिवाय या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली.   त्यानंतर त्याने अर्जुन, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या.  राधा प्रेम रंग रंगली आणि अबोली या मालिकेत तो झळकला.  

सचित लवकरच सोनाली कुलकर्णीसोबत ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  चित्रपटात सोनाली कुलकर्णी व सचितसह  सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल कुलकर्णी, भरत जाधव, आयुषी भावे, मनमीत पेम असे अनेक स्टार आहेत.

टॅग्स :सचित पाटीलसेलिब्रिटी