Join us
Daily Top 2Weekly Top 5

किरण मानेंचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फोटो होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 16:06 IST

Kiran mane: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या किरण माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे.

किरण माने (kiran mane)  हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनेक गाजलेले चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून ते कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहिले. परंतु, गेल्या काही काळापासून ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत आहेत. किरण माने सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असून अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो पाहून सध्या चाहते कमालीचे अवाक् झाले आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या किरण माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते कमालीचे हँडसम दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या या फोटोवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत.

'कोई कितना भी खेले मेरी खुशियों के साथ...हम इरादे के पक्के हैं, मुस्कुराना नहीं छोडेंगे !', असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. किरण माने यांचा हा नवा लूक अलिकडेच रिलीज झालेल्या 'टकाटक 2' या चित्रपटातील आहे. या चित्रपटात त्यांनी छोटेखानी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :किरण मानेटकाटकसेलिब्रिटीसिनेमा