Join us
Daily Top 2Weekly Top 5

किरण मानेंनी शेअर केला 'तो' फोटो, म्हणाले, "शराब तो छुटी मेरी भी गालिब, पर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 10:54 IST

किरण मानेंच्या पोस्ट हा अनेकदा चर्चेचा विषय असतो. सध्या त्यांच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठी अभिनेताकिरण माने 'बिग बॉस मराठी'मधून घराघरात पोहोचले. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात ते सहभागी झाले होते. तल्लख बुद्धी आणि उत्तम खेळाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. किरण मानेंनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, 'बिग बॉस मराठी'मुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. माने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर ते परखडपणे त्यांचं मत व्यक्त करताना दिसतात. 

अनेकदा किरण मानेंच्या पोस्ट हा चर्चेचा विषय असतो. सध्या त्यांच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बारमधील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्यांनी "शराब तो छुटी मेरी भी 'ग़ालिब', मगर क्यों...मयख़ाना कहने लगा, बिन पिए कोई मदहोश आया!", असं कॅप्शन दिलं आहे. त्यांचा हा फोटो व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

किरण माने सध्या 'सिंधुताई माझी माय' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. माने लवकरच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकरांच्या चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

टॅग्स :किरण मानेमराठी अभिनेताटिव्ही कलाकार