Join us  

Video: 'पारु'मध्ये भरत जाधवची दमदार एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 1:07 PM

Bharat jadhav: सध्या या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये भरत जाधवची झलक पाहायला मिळत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिकांची रेलचेल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच पारु या मालिकेची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. त्यामुळे या मालिकेचा पहिलाच भाग गाजला.या मालिकेत अनेक उत्तम कलाकार असून अष्टपैलू अभिनेता भरत जाधव (bharat jadhav) सुद्धा या मालिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता भरत जाधव याने आजवर अनेक गाजलेल्या मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, पूर्वीपेक्षा त्यांचा छोट्या पडद्यावरील वावर कमी झाला आहे. यामध्येच पारु या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये भरत जाधवची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे या मालिकेत ते झळणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, ते या मालिकेत खरोखर काम करणार की केवळ कॅमियो रोलमध्ये ते दिसणार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

'ऑडिशन लिस्टमध्ये मी शेवटची मुलगी होते'; 'पारु' फेम अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनचा किस्सा

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये भरत जाधव एका नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्यामुळे भरत जाधव यांना या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र, या मालिकेत ते कॅमिओ रोलमध्ये आहेत की खरोखर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत हे मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, यापूर्वी भरत जाधव दिग्दर्शक केदार जाधव यांच्या सुखी माणसाचा सदरा या मालिकेत झळकले होते. पारु ही मालिका १२ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनभरत जाधवसेलिब्रिटीसिनेमानाटक