Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हॅपी बर्थडे अहो", अंकुश चौधरीसाठी पत्नी दीपाची खास पोस्ट, म्हणते- ज्या दिवशी आपण लग्नगाठ बांधली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 11:54 IST

अंकुशची पत्नी आणि अभिनेत्री दीपा चौधरीने अभिनेत्याच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे.

नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अंकुशने अपार मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावलं. 'महाराष्ट्राची लोकधारा' मधून करिअरची सुरुवात केलेल्या अंकुशने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनयाने महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या अंकुश चौधरीचा आज वाढदिवस आहे. 

अंकुशची पत्नी आणि अभिनेत्री दीपा चौधरीने अभिनेत्याच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. अंकुशचा वाढदिवस असण्याबरोबरच आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. दीपाने अंकुशबरोबरचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. "हा दिवस माझ्या आयुष्यात दोन खास क्षण घेऊन येतो...ज्या दिवशी आपण लग्नगाठ बांधली आणि माझ्या लव्ह ऑफ लाइफचा वाढदिवस...हॅपी बर्थडे अहो आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा", असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अंकुशला चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अंकुशची पत्नी दीपादेखील एक अभिनेत्री आहे. झी मराठीवरील 'तू चाल पुढं' मालिकेतून तिने पुनरागमन केलं होतं. अंकुश आणि दीपाने २००७ साली लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगाही आहे. 

टॅग्स :अंकुश चौधरीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता