Join us  

'पावनखिंड' फेम अभिनेत्याची 'सिंघम ३'मध्ये वर्णी, रोहित शेट्टीच्या सिनेमात झळकणार मराठमोळा स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 12:42 PM

'सिंघम ३'मध्ये अजय देवगण, रणवीर सिंग, करीना कपूर, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. आता रोहित शेट्टीच्या या सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे. 

रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेला 'सिंघम' सिनेमा २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. अॅक्शनने भरपूर असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. यानंतर 'सिंघम' सिनेमाच्या सीक्वललाही प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता. 'सिंघम' आणि 'सिंघम अगेन'नंतर आता रोहित शेट्टीच्या 'सिंघम ३'ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'सिंघम ३'मध्ये अजय देवगण, रणवीर सिंग, करीना कपूर, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. आता रोहित शेट्टीच्या या सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे. 

'पावनखिंड' फेम अभिनेता अंकित मोहन रोहित शेट्टीच्या सिंघम ३मध्ये झळकणार आहे. या सिनेमात तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसेल. सेटवरील शूटिंगचा फोटो शेअर करत अंकितने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. "एक नवी जबाबदारी, नवा चेहरा, नवीन टीम, नवीन ठेहराव आणि एक नवं नाव!!! छत्रपती शिवाजी महाराज की जय...लवकरच भेटुया", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही शुभेच्छा दिल्या आहेत. 

अंकितने 'पावनखिंड', 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' या ऐतिहासिक सिनेमातून अभिनयाची छाप पाडली. त्याबरोबरच त्याने हिंदी मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'क्रॅक' सिनेमात तो झळकला होता. त्याबरोबरच 'महाभारत' या टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेत त्याने अश्वत्थामा ही भूमिका बखुबीने साकारली होती. 

टॅग्स :रोहित शेट्टीमराठी अभिनेताअंकित मोहन