Join us
Daily Top 2Weekly Top 5

Amey Wagh : म्हणून मी रात्रीच छान आवरून झोपतो..., अमेय वाघची ‘लयभारी’ पोस्ट  वाचली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:52 IST

Amey Wagh : अमेय जितका उत्तम अभिनेता आहे, तितका उत्तम विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. त्याच्या अफाट विनोदबुद्धीची साक्ष देणारी अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. 

अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh ) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरातल्या तरूणाईला अमेय वाघची ओळख झाली. पुढे फास्टर फेणे, मुरांबा यासारख्या त्याच्या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावलं आणि नंतर वेबसीरिजमधून त्याने हिंदी मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण केलं. अमेय जितका उत्तम अभिनेता आहे, तितका उत्तम विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. त्याच्या पोस्ट वाचल्यावर तुम्हालाही हे पटेल. त्याच्या विनोदबुद्धीची साक्ष देणारी अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. 

इन्स्टाग्रामवर अमेयने स्वत:चा एक सुटाबुटातला फोटो शेअर केला आहे. पलंगाजवळ उभा राहून अमेय मस्तपैकी पोझ देतोय. पण या पोझपेक्षा या फोटोला त्याने दिलेली कॅप्शन भन्नाट आहे.

‘मला स्वप्नातच सगळे अवार्ड्स मिळतात...म्हणून मी रात्रीच छान आवरून झोपतो..,’ असं भारी कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘स्वॅग से करो अवार्ड का स्वागत,’ असं एकाने म्हटलं आहे. ‘तुझी कॅप्शन मस्तच असतात,’ असं एका चाहत्याने लिहिलं आहे. भारी राव, ह्यात पण स्वॅग आहे, व्वा शेठ अशा कमेंट्स अन्य चाहत्यांनी केल्या आहेत. ‘सुटाबुटात झोपणारा हा पहिलाच वाघ असेल’, अशी कमेंट्स एका चाहत्याने केली आहे.

अलीकडे अमेयचा ‘मी वसंतराव’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात त्याने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचं अफाट कौतुक झालं होतं. 

   

टॅग्स :अमेय वाघ