Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या राजश्रीची भरारी

By admin | Updated: July 15, 2015 02:16 IST

अनिल कपूरची बहुचर्चित ‘२४’ मालिका आणि त्यातली डॅशिंग एटीएस आॅफिसर आठवते... नक्कीच... तीच राजश्री देशपांडे. मूळची औरंगाबादची.

अनिल कपूरची बहुचर्चित ‘२४’ मालिका आणि त्यातली डॅशिंग एटीएस आॅफिसर आठवते... नक्कीच... तीच राजश्री देशपांडे. मूळची औरंगाबादची. तेथेच ग्रॅज्युएशन झालं आणि पुण्यातून ‘लॉ’चे शिक्षण घेतले. औरंगाबादहून भरारी घेऊन मराठी नाटक, शॉर्टफिल्म करीत तिने थेट मल्याळम्, बंगाली चित्रपटसृष्टीपर्यंत मजल मारली. आपल्या अभिनयाच्या प्रवासाविषयी राजश्री सांगते,‘‘अभिनयाची सुरुवात तशी वयाच्या तिसऱ्या वर्षीच केली. पण अभिनयात करियर करण्याचं ठरलं नव्हतं. काहीतरी वेगळं करायचं म्हणून वयाच्या १८व्या वर्षी घर सोडलं आणि पुण्यात ‘लॉ’ला अ‍ॅडमिशन घेतली... वकीलही झाले. पण आर्थिक परिस्थिती आणि पुणं सोडायचं नाही म्हणून अ‍ॅड एजन्सी काढली. ५ वर्षं ती चालवलीही... पण तेथे मन रमेना..! म्हणून नसरुद्दीन शहा यांच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घेतली व खरं आवडीचं आयुष्य सुरू झालं.’’त्यानंतर मात्र आॅफर येऊ लागल्या. प्रसिद्ध फ्रेंच पॅन नलीन यांच्या ‘अ‍ॅन्ग्री इंडियन गॉडेसेस’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मल्याळम् चित्रपट ‘हरम’मध्ये तिने मध्यवर्ती भूमिका केली आहे. याशिवाय सलमान खानच्या ‘किक’मध्येही ती झळकली. वेगवेगळ्या ३० शॉर्ट फिल्मसमध्ये तिने काम केले आहे. ‘मुंबई सेंट्रल’ या शॉर्ट फिल्ममध्ये एड्सग्रस्त मुलीची भूमिका करताना प्रत्यक्ष घटनास्थळांवरचे चित्रण केले आहे. महाभारतावर आधारित एका नृत्यनाटिकेचे दिग्दर्शन, कोरिओग्राफी आणि निर्मितीही तिने केली आहे. मराठी अभिनेत्री भाषेच्या सीमा ओलांडून इतर भाषिक चित्रपटांतही काम करू लागल्या आहेत. नेहा पेंडसे, रेणू देसाई ही त्यातील काही नावे. मराठी रंगभूमी आणि शॉर्ट फिल्ममध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेली राजश्री देशपांडेही एका मल्याळम् चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसत आहे. राजश्रीने एका फ्रेंच दिग्दर्शकाबरोबरही काम केले आहे. तिच्या अभिनयाचा प्रवास...