Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानसी नाईकच्या लग्नाचं काउंटडाउन सुरू, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर

By तेजल गावडे | Updated: December 30, 2020 12:17 IST

आता मानसीच्या लग्नाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत यांचे लग्न पार पडल्यानंतर आता अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेले अनेक दिवस अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. मानसीने तिच्या वाढदिवसाला प्रेमाची कबुली दिली होती, त्यानंतर दोघांनी साखरपुडासुद्धा केला. आता मानसीच्या लग्नाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.

मानसी उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. तर प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यात आता तिचे बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले आहेत.

तिच्या खास मैत्रिणींनी तिच्यासाठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. या बॅचलर पार्टीचे काही फोटो मानसीने सोशल मीडियावर शेअर केले आहे आणि म्हटले की, मी माझ्या बहिणींशिवाय मिस्टरांसोबत लग्न करू शकत नाही. जवळचे फ्रेंड्स आयुष्यातील खरा खजिना आहे.  या हाऊस पार्टीमध्ये मानसीने स्पेशल आणि ट्रेंडी केकसुद्धा कापला.

मानसी नाईक १९ जानेवारीला लग्न करणार आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

मानसीच्या लग्नाची तारीख कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. ते सोशल मीडियाद्वारे तिला शुभेच्छा देत आहेत. पण या पोस्टवरील एक कमेंट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही कमेंट दुसरी कोणाची नसून प्रदीप खरेराची आहे. प्रदीपने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझी लाडो राणी तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आयुष्यातील प्रत्येक क्षणी मी तुला साथ देईन...

मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.

एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

टॅग्स :मानसी नाईक