Join us
Daily Top 2Weekly Top 5

अब निवेदन नही, नरसंहार! मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा जबरदस्त टिझर पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 15:14 IST

मनोज वाजपेयी यांचा १०० वा सिनेमा 'भैय्याजी'चा टिझर भेटीला आलाय. तुम्हीही बघा

मनोज वाजपेयी हे लोकप्रिय अभिनेते. 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'स्पेशल 26', 'सोनचिरीया' अशा एकापेक्षा एक हटके सिनेमांमधून मनोज वाजपेयींनी त्यांचं स्वतःचं असं फॅन फॉलोईंग निर्माण केलं. मनोज वाजपेयींची सिने कारकीर्द आता १०० व्या सिनेमापर्यंत येऊन पोहोचली आहे. मनोज यांचा १०० वा सिनेमा अर्थात 'भैय्याजी'चा दमदार टिझर भेटीला आलाय. 

टिझरमध्ये बघायला मिळतं गावच्या मैदानात बरीच गर्दी जमली असते. मनोज वाजपेयी बेशुद्ध पडले असतात. त्यांना मारण्यासाठी सर्व गावकरी पुढे आलेले असतात. अचानक वाजपेयी स्वतःचा डोळा उघडतात. हे पाहताच गावकरी घाबरून दूर पळून जातात. मग पुढे वाजपेयी जखमी असले तरीही त्यांच्या डोळ्यात प्रचंड राग धुमसत असतो. अशाप्रकारे 'भैय्याजी'च्या माध्यमातून मनोज वाजपेयी पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

विनोद भानुशाली - समीक्षा शईल ओसवाल आणि मनोज वाजपेयी यांनी मिळून 'भैय्याजी' सिनेमाची निर्मिती केलीय. या सिनेमात मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत आहे. २४ मे २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. मनोज वाजपेयी यांच्या समृद्ध सिनेकारकीर्दीत 'भैय्याजी' हा त्यांचा १०० वा सिनेमा आहे हे विशेष. चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

टॅग्स :मनोज वाजपेयीबॉलिवूड