Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’ हे संवादासाठी महत्त्वाचे माध्यम; आमिर खानचं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 08:39 IST

चित्रपट क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व, पण आता बदलही झाला : रविना टंडन

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ‘मन की बात’ कार्यक्रम हे संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य नागरिकांशी संपर्क साधतात, असे मत अभिनेते आमिर खान यांनी बुधवारी व्यक्त केले. 

मन की बात’चे १०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री रविना  टंडन म्हणाल्या, चित्रपटसृष्टीत महिलांनी कॅमेऱ्याच्या पुढे, मागे दोन्ही आघाड्यांवर चौकटी तोडल्या आहेत. सर्व क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री  अनुराग ठाकूर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. 

मन की बात@१०० कार्यक्रमात अभिनेता आमिर खान, अभिनेत्री रविना टंडन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

संवादाचे हे एक अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे ज्याद्वारे सामान्य लोकांशी संवाद साधला जातो. अशाप्रकारे तुम्ही संवादातून नेतृत्व करता. तुम्हाला भविष्याबद्दल काय वाटते ते तुम्ही तुमच्या लोकांना सांगतात.     - आमिर खान 

१०० रुपयांचे नाणे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मन की बात @१०० निमित्त राष्ट्रीय कॉन्क्लेव्हमध्ये नवी दिल्लीत बुधवारी विशेष टपाल तिकिट, १०० रुपयांचे नाणे जारी केले. यावेळी मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते.

टॅग्स :आमिर खानमन की बातनरेंद्र मोदी