Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंजिरीने नकार दिला मालिकेला

By admin | Updated: April 29, 2017 01:12 IST

मंजिरी फडणीसने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती मराठी चित्रपटातदेखील राकेश बापटसोबत झळकली होती.

मंजिरी फडणीसने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती मराठी चित्रपटातदेखील राकेश बापटसोबत झळकली होती. बॉलिवूडमधील मराठी मुलगी अशीच तिची ओळख आहे. मंजिरीला नुकतीच एका हिंदी मालिकेची आॅफर आली होती. पण मालिकांमध्ये काम करायचेच नाही, असे तिने ठरवले असल्याने तिने या मालिकेसाठी नकार दिला आणि तिची जागा संजीदा शेख या अभिनेत्रीने घेतली. तिला सध्या तरी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. बॉलिवूड चित्रपट आणि इतर काही प्रोजेक्टमध्ये ती व्यग्र असल्याचे कळते. मंजिरीला चित्रपटात करियर करायचे असल्याने पुढील काळात ती एखाद्या मराठी चित्रपटात पुन्हा झळकली तर नक्कीच आश्चर्य वाटायला नको.