Join us

मंगेश करतोय साउथ आफ्रिकेत शूटिंग

By admin | Updated: October 20, 2016 02:28 IST

अभिनेता मंगेश देसाईने त्याच्या अभिनयाची चुणूक अनेक चित्रपटांतून दाखविली आहे.

अभिनेता मंगेश देसाईने त्याच्या अभिनयाची चुणूक अनेक चित्रपटांतून दाखविली आहे. सध्या मंगेश त्याच्या आगामी शॉर्ट फिल्मचे शूटिंगसाठी साऊथ आफ्रिकेत गेला आहे. नुकतेच त्याने याविषयी सोशल साईट्सवर लिहिले आहे फ्लाईंग टू साऊथ आफ्रिका, अ‍ॅन्ड शूट फॉर अ शॉर्ट फिल्म. बरे मंगेश फक्त शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठीच नाही तर 'एक अलबेला' या त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी देखील तिकडे गेला आहे. मंगेशच्या एक अलबेला या चित्रपटाचे समीक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केले होते. आता या चित्रपटाची स्क्रिनिंग थेट साऊथ आफ्रिकेला होते आहे. यासाठी मंगेश फारच उत्सुक आणि आनंदी आहे. त्याची ही शॉर्ट फिल्म कोणत्या विषयावर आहे किंवा कोण दिग्दर्शित करणार आहे, या गोष्टींचा खुलासा तरी अजून झालेला नाही. परंतु लवकरच प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत मंगेश या लघुचित्रपटाच्या निमित्ताने दिसणार आहे. तसेच विद्या बालनसोबत एक अलबेलामध्ये स्क्रीन शेअर करूनदेखील मंगेश कुठेही कमी पडला नाही, तर त्याने स्वत:ची छाप या चित्रपटात उमटविली आहे. एवढेच नाही, तर आता लवकरच आपल्याला मंगेश मराठी देवदास या चित्रपटातदेखील देवाची भूमिका साकारताना दिसणार आहे.