Join us

मंगेश-कीर्तीची बावरी साद

By admin | Updated: September 28, 2016 02:13 IST

आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक मंगेश बोरगावकर आणि गायिका कीर्ती किलेदार लवकरच प्रेक्षकांसाठी एक नवे गाणे घेऊन येत आहेत. ‘बावरी साद’ असे

आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक मंगेश बोरगावकर आणि गायिका कीर्ती किलेदार लवकरच प्रेक्षकांसाठी एक नवे गाणे घेऊन येत आहेत. ‘बावरी साद’ असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याविषयी ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना मंगेश सांगतो की, ‘सध्या नॉन फिल्म असणाऱ्या प्रेक्षकांमध्ये अल्बमची क्रेझ निर्माण झाली आहे. या नॉन फिल्म प्रेक्षकांचा एक वर्गच तयार झाला आहे. नॉन फिल्म प्रेक्षकवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून ‘बावरी साद’ हे रोमँटिक गाणे तयार केल्याचे मंगेशने सांगितले. आतापर्यंत मी आणि कीर्तीने केलेल्या अल्बमपेक्षा हे गाणे खूप वेगळे असले. या गाण्यातील शब्द, संगीत मनाला स्पर्श करणारे असून, संगीत दिले आहे नितेश मोरेने, तर शलाका देशपांडेने हे गाणे लिहिले आहे.