Join us

मंदिरा बेदीची 'बिकनी सारी' फॅशन

By admin | Updated: June 6, 2016 13:48 IST

२००३ वर्ल्डकप स्पर्धेचे अभिनेत्री मंदिरा बेदीने स्टुडिओमधून सूत्रसंचालन केले होते. त्यावेळी तिने परिधान केलेल्या साडयांची बरीच चर्चा झाली होती.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ६ - २००३ वर्ल्डकप स्पर्धेचे अभिनेत्री मंदिरा बेदीने स्टुडिओमधून सूत्रसंचालन केले होते. त्यावेळी तिने परिधान केलेल्या साडयांची बरीच चर्चा झाली होती. आताही मंदिराने अशाच नव्या साडीचा शोध लावला आहे. 
 
इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोंमुळे मंदिराची ही नवीन बिकनी सारी चर्चेचा विषय ठरत आहे.  सध्या मंदिरा पती राज कौशल आणि मुलगा वीर सोबत सुट्टया घालवण्यासाठी मालदीवला गेली आहे. 
 
मालदीवच्या समुद्रा किना-यावरील बिकनी सारीवरील हॉट फोटो मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. वयाच्या ४४ व्या वर्षीही मंदिराचा हा सेक्सी लूक पाहणा-याचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री बिपाशा बासूने तिचे मालदीवच्या किना-यावरील हॉट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन चर्चेत राहिली होती. ती आणि करणसिंह ग्रोव्हर हनिमूनसाठी मालदीवला गेले होते.