Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून पतीला घटस्फोट दिल्यानंतर 'या' अभिनेत्यासह अशा अवस्थेत दिसली 'ही' अभिनेत्री,सोशल मीडियावर घालते धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:20 IST

सध्या या दोघांचा लिपलॉक सीन तुफान व्हायर होत आहे. स्विमिंग पूलमध्ये दोघे रोमान्स करताना असून यात मंदनाचा अधिक बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे.

बोल्ड सीन, किसिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं. रसिकांनाही यांत काहीही वावगं वाटत नाही. बोल्ड सीन आणि किसिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. नुकतेच प्रदर्शित झालेल्या दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या सिनेमात अंडरवॉटर किसिंग सीक्वेन्स शूट केला जो जवळपास 1 मिनिटांचा होता. या सिनेमात रसिकांना त्या दोघांचा रोमँटिक अंदाज अनुभवायला मिळाला. या किसिंग सीनने अक्षरक्षः सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. आता याच पाठोपाठ आणखीन एक जोडी याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 

अभिनेत्री मंदना करिमी आणि करणवीर बोहरा दोघेही 'द कसीनो' वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. या मध्ये दोघेही इंटेन्स रोमांन्स करताना पाहायला मिळणार आहेत. नुकताच या वेबसिरीजचा टीजर समोर आला आहे. यात दोघेही किसिंग करताना पाहायला मिळत आहेत. सध्या या दोघांचा लिपलॉक सीन तुफान व्हायर होत आहे. स्विमिंग पूलमध्ये दोघे रोमान्स करताना असून यात मंदनाचा अधिक बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे.

मंदना करिमी बिग बॉस या शोमुळे प्रकाशझोतात आली. या कार्यक्रमानंतर ती काही सिनेमात झळकली होती. सध्या ती तिच्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. तिचे काही महिन्यांपूर्वी गौरव गुप्तासोबत लग्न झाले होते. पण तिने गौरवविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. मात्र हे करत असलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा एका वेबसाईटने केला होता. मंदना नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिच्या या फोटोंना अनेक लाईक्स आणि शेअर मिळत आहेत.

टॅग्स :करणवीर बोहरा