- उडती खबरमानसी नाईकला आपण अभिनेत्री म्हणून ओळखतोच. परंतु मानसी एक उत्तम नृत्यांगना असल्याचेदेखील तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे. मानसीने फक्त डान्स केला नाही, तर डान्स रिअॅलिटी कार्यक्रमाचे परीक्षणदेखील केले आहे. आता मानसीने एक पाऊल पुढे टाकल्याचे समजते आहे. एका अल्बम सॉँगची कोरिओग्राफी तिने केली असल्याचे कळतेय. याआधीदेखील तिने हॅलो गाण्याची कोरिओग्राफी केली होती. आता पुन्हा ती गाणे कोरिओग्राफर करण्यास सज्ज झाली असल्याचे समजतेय.
मानसी नाईक झाली कोरिओग्राफर
By admin | Updated: October 27, 2016 03:10 IST