Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्रीने धक्कादायक Video केला शेअर, वडीलच देत आहेत कुटुंबाला त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:46 IST

वडीलही आहेत अभिनेते

मल्याळम अभिनेत्री अर्थना बिनु (Arthana Binu) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने स्वत:च्या वडिलांवरच धक्कादायक आरोप केले आहेत. तिने आपले वडील अभिनेता विजय कुमार यांचा घरात घुसतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ते घरी येऊन आम्हाला धमकी देतात असे आरोप तिने केले आहेत.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, अर्थनाच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर विजय कुमार अर्थनाच्या आईला घरात घुसून धमकवायला लागले. घराचं वातावरणच बिघडलं. अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत लिहिले,'हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही. अनेक दिवसांपासून आम्ही या त्रासाला सामोरे जात आहोत.'

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. पहिल्याच वेळी आम्ही तक्रार दाखल केली होती. पण आजपर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली नाही. मी सध्या आई, बहीण आणि आजीसोबत राहत आहे. माझ्यावर त्यांच्या जबाबदारी आहे.'

नेमकं काय घडलं ?

अभिनेत्रीने व्हिडिओत सांगितले, 'आज ते पुन्हा आमच्या घरी घुसले. दरवाजा बंद होता त्यामुळे त्यांनी खिडकीतून धमकी द्यायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी माझ्या बहीण आणि आजीच्या जीव घेण्याची भाषा केली तेव्हा मी त्यांना खडसावलं. आम्ही त्यांचं ऐकलं नाही तर ते कोणत्याही थराला जातील अशी धमकी त्यांनी मला दिली होती. मी ते सांगतील त्याच सिनेमांमध्ये काम करायचं असाही त्यांचा दबाव होता. त्यांच्याविरोधात कोर्टात केसही सुरु आहे तरी ते सुधरायचं नाव घेत नाहीत.'

टॅग्स :पोलिसपरिवारकेरळ