वाट या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे पाऊलवाट आणि दुसरे म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात वादळ आल्यावर त्याची लागणारी वाट या अर्थाने हा शब्द वापरला जातो. काही वर्षांपूर्वी हा शब्द बॉलिवूडमध्येही फेमस झाला ते मुन्नाभाई M.B.B.S मधील संजय दत्तमुळे. पण आता हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संजय लीला भन्सालींच्या बाजीराव-मस्तानी चित्रपटातील गाण्यांवर. मुळातच वाद सुरू असतानाच मल्हारी गाण्यातील वाट या शब्दाने पुन्हा एकदा चित्रपटाचीच ‘वाट’ लावायचे ठरवले आहे. कारण वाट हा शब्द पेशव्यांच्या काळात प्रचलित होता का? मग तो गाण्यात कसा वापरला गेला असे अनेक वाद सध्या सुरू आहेत. मात्र हे गाण लिहिलं आहे मराठमोळ्या प्रशांत इंगोले यांनी. ते या गाण्याबद्दल खुलासा करताना सांगतात, ‘श्रीमंत बाजीराव पेशवे हे एक महान योद्धे होते. त्यांनी कधीही पराभूत न होता तब्बल ३६ लढाया जिंकल्या. मी स्वत: मराठी असल्याने मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यामुळे ‘मल्हारी’ हे गाणं करताना बाजीराव पेशव्यांच्या विजयोत्सव आणि शत्रूचा पराभव उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्यासाठी ‘वाट’ हा शब्द घेतला आहे.’
मल्हारी गाण्यातील ‘वाट’ शब्द वादात
By admin | Updated: December 11, 2015 01:28 IST