Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : ये कौनसा जिम है भाई? मलायका अरोराचा जिम लूक पाहून सगळेच झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 14:45 IST

फिटनेस क्विन म्हणून ओळखली जाणारी ‘छैय्या छैय्या गर्ल’सध्या तिच्या जिम लूकमुळे ट्रोल होतेय.

ठळक मुद्देवयाची चाळीशी ओलांडलेली मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय.

तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा होतात. गेल्या अनेक वर्षांपासून  यशस्वी अभिनेत्री हे बिरुद मोठ्या मानाने मिरवणारी ही अभिनेत्री सध्या   वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. आम्ही बोलतोय ते ‘छैय्या छैय्या गर्ल’ मलायका अरोरा हिच्याबद्दल.   रूपेरी पडद्यावर तिचे फारसे दर्शन घडत नसले तरी विविध पार्ट्या, इव्हेंट्स आणि फिटनेस व्हिडीओमधून चाहत्यांना तिचे दर्शन होते. फिटनेस क्विन म्हणून ओळखली जाणारी हीच ‘छैय्या छैय्या गर्ल’सध्या तिच्या जिम लूकमुळे ट्रोल होतेय.

 मलायका  तिच्या खास फिटनेससाठी ओळखली जाते.  मलायकाचे फिटनेस व्हिडिओ आणि फोटो अधूनमधून सोशल मीडियावर व्हायरल  होत असतात. सध्या मलायकाचे जिम लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आता मलायकाचे फोटो म्हटल्यावर यूजर्स त्यावर काही बोलणार नाही, हे शक्यच नाही. मलायकाच्या या ताज्या फोटोंवरही हजारो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी मलायकाचे हे फोटो पाहून तिची प्रशंसा केली आहे तर काहींनी मात्र नेहमीप्रमाणे तिला ट्रोल केले आहे. होय, या फोटोतील मलायकाचा अवतार इतका हॉट आहे की, अनेकांना तो रूचला नाही.  

मुंबईच्या रस्त्यांवर असे कपडे घालून गुन्ह्यांना निमंत्रण देणे कितपत योग्य आहे? असा सवाल एका युजरने केला आहे. अन्य एका युजरने ‘ये कौनसा जिम है भाई’ अशा शब्दांत मलायकाला ट्रोल केले आहे.

वयाची चाळीशी ओलांडलेली मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा  आहे. सुरूवातीला रिलेशनशिपच्या बातम्या सगळ्या अफवा असल्याचे सांगून अर्जुन व मलायका आपले नाते जगापासून लपवत राहिले. पण आता दोघेही खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात.   

टॅग्स :मलायका अरोरा