Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो..! रेस्टॉरंटच्या बाथरूममधून जीन्स न घालताच बाहेर पडली मलायका अरोरा, झाली कावरीबावरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 18:15 IST

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी ती तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर(Arjun Kapoor) सोबतच्या जवळीकांमुळे तर कधी तिच्या बोल्ड आउटफिट्समुळे चर्चेत असते.  तिची एक इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने जीन्स न घालता रेस्टॉरंटच्या बाथरूममधून बाहेर पडल्याचे सांगितलं होतं. 

कोरोनाच्या काळात त्याच्यासोबत ही घटना घडली. मलायकाने इंस्टा स्टोरीद्वारे सांगितले की, त्यावेळी सर्वजण कोरोनामुळे घाबरले होते. आम्ही पण पागल झालो होतो. मी एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेलो. तिथे मी माझ्या हाताच्या कोपराने दार उघडले. त्यानंतर पायाने टॉयलेट सीट उचलली. टिश्यू पेपरच्या आधाराने फ्लॅश केलं आणि हात धुवून बाहेर पडलो. जेव्हा मी माझ्या सीटवर आलो तेव्हा मला समजले की मी माझी पँट घालायला विसरले आहे.  मलाइकाने सांगितले की तिला किती लाज वाटली होती.

मलायकाने अलीकडेच इन्स्टाग्राम स्टोरीजवर दोन मजेदार किस्से शेअर केले होते. याध्ये तिने कोविड -19 ची लस घेतल्यानंतर घरी येणाऱ्या सर्व पाहुण्यांना काय बोलते ते सांगितले होते. मलायकाने लिहिले होते, 'जेव्हा पाहुणे घरी यायचे, तेव्हा मी त्यांना म्हणायचे, घाबरू नका, आमच्या कुत्र्याचं लसीकरण केले आहे. आता मी त्यांना सांगते, घाबरू नका, आम्हीसुद्धा व्हॅक्सिनेशन घेतलं आहे. '

 

टॅग्स :मलायका अरोरा