Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपूर कुटुंबात मलायका अरोराची झाली एन्ट्री, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 13:20 IST

अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी मलायका अरोराने तिचा व अर्जुनचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी मलायका अरोराने तिचा व अर्जुनचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मलायकाच्या या फोटोसोबत ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं कन्फर्म झालंय. मात्र आता न्यूयॉर्कमधील मलायकाचा नवा फोटो समोर आला आहे जो पाहून तुम्हाला मलायका कपूर कुटुंबाच्या किती जवळ आली असल्याचे समजतं.

खरेतर अर्जुन व मलायका यावेळी न्यूयॉर्कमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहेत. अर्जुन कपूरचे काका म्हणजेच संजय कपूरदेखील त्याची पत्नी मिहिप कपूर व मुलगा जहानसोबत न्यूयॉर्कमध्ये पोहचले आहेत. तिथे ते मलायका व अर्जुनला भेटले असून या भेटीचा फोटो मिहिप कपूरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात मलायका, जहान व अर्जुनही पहायला मिळतोय.  

फोटो शेअर करीत मिहिपने लिहिले की, जय हिंद. या फोटोवर मलायका अरोराने देखील कमेंट केली की, सो कॅण्डिड. 

मलायकाने यावेळी नियॉन रंगाचा आऊटफिट परिधान केले असून त्यात ती खूप हॉट दिसते आहे. 

मलायका व अर्जुन यांच्या रिलेशनशीपची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. मात्र दोघांनी अद्याप रिलेशनशीपबद्दल खुलासा केलेला नाही. मलायकाने अखेर अर्जुनने फोटोसोबत जाहीर केलं की ती अर्जुनला डेट करतेय.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर