Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेकअपविना अभिनेत्री

By admin | Updated: April 5, 2017 03:33 IST

या अभिनेत्रींच्या सौंदर्यावर कित्येक जण घायाळ होतात..

-सुवर्णा जैनया अभिनेत्रींच्या सौंदर्यावर कित्येक जण घायाळ होतात... त्यांचं हे सौंदर्य... अदा... लुक्स पाहून त्यांच्यासारखं सुंदर दिसावं असं अनेकांना वाटतं...मात्र रिल आणि चमचमत्या दुनियेतल्या या अभिनेत्री रियल लाइफमध्ये मेकअपविना कशा दिसतात, याची अनेकांना उत्सुकता असते.

सिनेमा असो किंवा एखादा इव्हेंट. सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूडच्या या अभिनेत्री स्वत:च्या मेकअपवर बरीच मेहनत घेतात. या अभिनेत्रींच्या सौंदर्यावर कित्येक जण घायाळ होतात. त्यांचं हे सौंदर्य... अदा... लुक्स पाहून त्यांच्यासारखं सुंदर दिसावं असं अनेकांना वाटतं. मात्र रिल आणि चमचमत्या दुनियेतल्या या अभिनेत्री रियल लाइफमध्ये मेकअपविना कशा दिसतात याची अनेकांना उत्सुकता असते. आता तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत मेकअपविना अभिनेत्रींचा अवतार.... सोनम कपूर... फॅशनिस्टा अशी सोनमची ओळख... फॅशनबाबत काटेकोर असलेली सोनम... मेकअपविना तिचा अवतार मात्र थोडा निराळाच... फॅन्सना तिचा हा रिअल अवतार मात्र फारसा भावणार नाही.प्रियांका चोप्रा... देसी गर्लच्या अदांवर सारेच घायाळ. मात्र पिग्गी चॉप्सचा मेकअपविना अवतार पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की हीच का आपली प्रियांका... बीचवर गेलेल्या अनेकांप्रमाणे तिची स्कीन तुम्हाला पाहायला मिळेल.करीना कपूर-खान... बेगम करीना... कुणालाही मोहात पाडेल असे बेबोचं सौंदर्य... मात्र मेकअपविना करिनाचा हा अवतार पाहा... तिचा हा अवतार साधा वाटत असला तरी गोरीपान बेबो कुणालाही भुरळ घालेल...कॅटरिना कैफ... इंग्लिश मेम.. मेकअप असो किंवा नसो कॅटचा अंदाज कायम सारखाच असतो... तिच्या स्टाईल आणि सौंदर्यात फारसा फरक तुम्हाला जाणवणार नाही...