Join us
Daily Top 2Weekly Top 5

समीरा रेड्डीला मिळाला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला; म्हणाली, 'मी २८ वर्षांची असतांना..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 13:59 IST

Sameera reddy: समीरा करिअरच्या टॉपवर असतांना अनेकांनी तिला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. लोकांच्या सल्ल्यानंतर अभिनेत्रीने एक मोठा निर्णय घेतला होता.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इतरांच्या सल्ल्याने कॉस्मॅटिक सर्जरी केली आहे. तर काही अशाही अभिनेत्री आहेत ज्यांना फक्त कॉम्सेटिकच नाही तर फिजिकली चेंजेसही करण्याचे सल्ले देण्यात आले होते. यामध्येच प्रसिद्ध अभिनेत्री समीरा रेड्डी हिने तिचा एक्सपिरिअन्स शेअर केला आहे. इंडस्ट्रीतील अनेकांनी तिला चक्क ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता.

समीराने 'हिंदुस्तान टाइम्स'ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिला आलेल्या विचित्र अनुभवावर भाष्य केलं आहे. करिअरच्या टॉपवर असतांना तिला अनेकांनी ब्रेस्ट सर्जरी करुन साईज वाढवण्याचा सल्ला दिला होता.

समीराला मिळाला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला

"मी माझ्या करिअरच्या टॉपवर होते त्यावेळी मला अनेकांनी ब्रेस्टची साईज वाढवण्याचा सल्ला दिला होता. अनेकांनी तर माझ्यावर सर्जरी करण्याचा दबावच टाकला होता. खूप लोक म्हणायचे, समीरा, सगळेच करताये मग तू का नाही करत?मला वैयक्तिकरित्या स्वत: मध्ये असा कोणताही बदल करायचा नव्हता. या सर्जरी करणं म्हणजे तुम्ही तुमच्यातील दोष लपवण्यासारखं आहे. पण, हा काही दोष नाहीये. तो जीवनाचा एक भाग आहे. जो व्यक्ती प्लास्टिक सर्जरी किंवा बोटोक्स करतो त्या कोणत्याही व्यक्तीला मला जज करायचं नाही. पण, मला मी जशी आहे तसंच राहणं योग्य वाटतं", असं समीरा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी जशी आहे त्यातच खूश आहे हे लोकांनी पाहिलंय आणि त्यांनी ते एक्सेप्टही केलंय. मी २८ वर्षांची असतांना फीट होते. पण, वयाच्या ४५ व्या वर्षी मी आता रिलॅक्स आहे. मी जेव्हा ४० वर्षांची होते त्यावेळी सोशल मीडियावर माझं वय ३८ दाखवलं जायचं. पण, मी लगेच ते बदलायला लावलं कारण, मी ४० वर्षांची आहे तर मला त्याचाही अभिमान आहे. "

दरम्यान, समीराने 'मुसाफिर', 'रेस', 'मैंने दिल तुझको दिया' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. आजवर तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, त्यानंतर तिचा इंडस्ट्रीतील वावर कमी झाला. परंतु, तिचं स्वत:चं युट्यूब चॅनेल असून त्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात कायम येत असते.

टॅग्स :बॉलिवूडसमीरा रेड्डीसेलिब्रिटीसिनेमा