अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया अर्थ रेशमी घोषला बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याची इच्छा आहे. तिने २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘फ्रॉम सिडनी विथ लव’ या चित्रपटात काम केले आहे. बॉलीवूडमधून एखादी चांगली आॅफर आली, तर नक्कीच कमबॅक करायला आवडेल असे तिने म्हटले आहे. रेशमी म्हणते की, ‘मला चित्रपटांमध्ये एखाद्या वेगळ्या भूमिकेची आॅफर मिळाली, तर मी ती करायचा विचार करेन.’ सध्या रेशमी तिच्या छोट्या पडद्यावरील भूमिकांमुळे खुश आहे. तिने ‘बुद्धा’ या मालिकेत काम केले असून महारक्षक आर्यन या काल्पनिक कथेवर आधारित असलेल्या मालिकेत ती दिसणार आहे. या मालिकेत ती विषकन्या हे नकारात्मक पात्र साकारत असून नोव्हेंबर महिन्यात या मालिकेचे प्रसारण सुरू होईल.
बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचंय : रेशमी
By admin | Updated: October 21, 2014 00:24 IST